Tuesday, September 25, 2012

पाचव्या वाढदिवसाबद्दल मनातलं थोडस.....


        आज आपल्या या "आपलीमराठी" उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण झाली, मागे वळून पाहिले तर समजलेच नाही कि हि पाच वर्षे कशी पटकन निघून गेली. समाधान आहे कि आपल्या प्रेक्षकांनीही हि पाच वर्षे खूप आनंदात घालवलेली आहेत. आजही मला तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो जेव्हां मी माझा पहिला ब्लॉग पोस्ट लिहिला होता. त्यामध्ये मी हे संकेतस्थळ काढण्याचा उद्देश लिहिला होता आणि पाच वर्षे मागे वळून पाहताना  आम्हाला  खूप आनंद होत आहे. जे आपली मराठीचे अगदी पाहिल्यापासुनचे प्रेक्षक आहेत त्यांना लख्खं आठवत असेल  की २००७ साली फक्त आणि फक्त  ३ ते ४ चित्रपट होते जे मराठी प्रेक्षक ऑनलाईन पाहू शकत होते.  तसे भारताबाहेर राहणाऱ्यांसाठी सिनेमा/नाटक पाहण्यासाठी पर्याय  नव्हताच मुळी,  भारतात सहज मराठी चित्रपट पाहता येतात पण भारताबाहेरच्या लोकांचे काय? बाकी सर्व भाषेतले सिनेमे जर सहजासहजी मिळत असतील तर मराठी का नाही? आम्हाला हाच प्रश्न भेडसावत होता.

         २६ सप्टे २००७ उजाडले  आणि आम्हाला उत्तर मिळाले "आपलीमराठी" , मग एका पेजने आपलीमराठीची   सुरवात झाली आणि तुमच्यासारखे खूप मित्र मिळत गेले ज्यांनी मराठी मनोरंजनाला आपलेसे  केले आणि आज संकेतस्थळावर ५०० हूनही अधिक चित्रपट आहेत ,वेगवेगळ्या मालिका व नाटके आहेत आणि हे रोज अपडेट  केले जातात न चुकता  न थांबता रोज म्हणजे रोज............

         आपलीमराठी चालवणे हे सोपे काम तर नक्कीच नव्हते कारण एकतर  तुटपुंजे  आर्थिक बळ , त्यात पाहणारे लोक कमी आणि कामात सातत्य देनारे लोक,  मला वाटते कि सर्व मराठी लोक जे आपले असे काही वेगळे  करायला जातात त्यांना वरील सर्व  संकटे जरूर भासत असतील , पण कसे तरी मजल दर  मजल  करत आम्ही ते उभे करत राहिलो . तुम्हाला वाचून खूप आश्चर्य वाटेल कि जेव्हा मी एकटा आपलीमराठी चा भार उचलत होतो तेव्हा माझे एकच ध्येय होते कि कुणी नाराज नाही झाले पाहिजे आणि सर्व काही  आपलीमराठीवर वेळेवर यायला हवे . खूपश्या मालिका भारतातील दुपार च्या वेळी येत असत तेव्हां  अमेरिकत पहाट असे तर मी ४ वाजता उठून  त्या मालिका तुमच्या साठी रेकॉर्ड करत असे . माझा एक आणि एकच मंत्र असे कि कोणत्याही कामात सातत्य महत्वाचे आहे, कारण आज केले आणि उद्या केले नाही तर मी एक एक करून जे मराठी लोक मराठी साहित्या जवळ आणत होतो ते दूर जाण्यास वेळ लागला नसता.

           तसा  मी काही पट्टीचा वेब साईट डेव्हलपर वगैरे नाही पण एक एक करून सर्व शिकत गेलो, आणि एकच  ध्यास ठेवला, आणि विश्वास बसत नाही कि आज मी ५ वर्ष पूर्ण चा लेख लिहित आहे. आणि हो आपलीमराठी सोबत खूपशी संकेत स्थळ आली आणि आपलीमराठीची नक्कल करण्याचा प्रयत्न  केला. पण मी म्हणालो ना कि सातत्य आणि फोकस हा कमी  कामा नये , आम्ही आपलीमराठीवरचा एक एक भाग अगदी विचारपूर्वक बनवला, आणि वरचे वर बदल करत राहिलो आणि अडथळे म्हणाल तर विचारूच नका , आमच्याकडे एवढे पैसे नव्हते कि आम्ही खूप चांगला सर्व्हर  घेऊ शकत होतो  त्यामुळे कमी किमतीतील सर्व्हर मुळे आपलीमराठी वरचे वर बंद पडत असे. शनीवार व रविवारी खूप गर्दी होत  असायची  आणि मग सर्व्हर आपला जीव मुठीत घेऊन शांत बसत असे, आणि एकदा सर्व्हर डाऊन झाला कि आमचा जीव खाली वर होत असे . आणि स्वस्त  दरातील प्रोव्हायडर त्या प्रमाणे तो दुरुस्त करत असत. पण ह्या सर्व गोष्टीवर आम्ही हळू हळू मात करत राहिलो, आणि प्रवास पुढे पुढे जात राहिला असो ..

           महत्वाचे  सांगायचे म्हणजे या सर्वांचे आणि आपलीमराठीच्या ५ वर्षांच्या यशाचे  श्रेय जाते ते  आपल्या गुणी  प्रेक्षकांना कारण त्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले.  जेव्हां तोंड भरून कौतुक केले तेव्हां आमच्यातला उत्साह वाढला, तर वेळोवेळी सूचनाही केल्या, ईमैल केले,  तक्रारी केल्या ज्याने आपलीमराठी अजून सुबक झाली, त्रुटी कळाल्या आणि हे कार्य करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले.   आपलीमराठी आपलीच आहे आणि आपण सर्वांनी मिळून तिला अशीच पुढे नेऊन तीचा २५ वा वाढदिवस असाच साजरा करू .

            आज आपण सगळेच पाहत आहोत मराठी चित्रपटसृष्टीही बदलत आहे. तरुण कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, संगीतकार, गायक या सर्वांनी मराठीच रूप पालटवले  आहे . मराठी वाहिन्याही दर्जेदार मालिका व कार्यक्रम देत आहेत विविध  उपक्रम राबवत आहेत  .आज आपण सर्वच याचा आपलीमराठीवर  आस्वाद घेत आहोत. आज  मराठी चित्रपटही यशस्वी होत आहेत व रसिकांचे यात योगदान आहे. अशीच आपली मराठी फुलात राहो हि आशा .......

          जेव्हा आपलीमराठी ने पाच वर्षांपूर्वी  सुरवात केली तेव्हा मायाजाळावर अगदी  ४-५ सिनेमे च असतील पण आज जर पाहिलेत तर मराठीचे अगदी वादळच आले आहे आणि  या त आपलीमराठी चा कुठे ना कुठे  तरी हात आहे. ज्यामुळे सर्वांना  कळाले कि भारता बाहेरचा मराठी प्रेक्षक  सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने  मराठी सिनेमे , नाटक पाहतो.

           मला असे वाटते कि या मायाजाळावर असणाऱ्या ७.३ करोड संकेतस्थळामध्ये  आपलीमराठीने सर्वांत जास्त  मराठीचे सर्व वेगळे प्रकार आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करून आपले एक अढळ स्थान सिद्ध केले आहे.
तुम्हालाही हे मान्य असेल ना ?

सरते शेवटी एवढेच समाधान आहे…की “आपलीमराठी” मुळे खुप मराठी प्रेमी खुश आहेत…..

आपली मराठी च्या पाचव्या वाढदिवसाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमची साथ अशीच मिळत  राहो हीच अपेक्षा!!

एक मराठी प्रेमी
www.ApaliMarathi.com
प्रत्येकाच्या मनाच्या अगदी जवळ
आपलीमराठीला हातभार लावण्यासाठी येथे जा 


Saturday, November 24, 2007

असाही विचार करणारा आपल्यातला एक..

प्रशांत कांबळे, अमेरिका [ Friday, June 22, 2007 06:05:56 am]

कुणीही स्वेच्छेने किंवा आनंदाने आपल्या लोकांपासून दूर राहाणे पसंत करत नाही. प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतात म्हणूनच आम्ही आपला देश सोडून जातो. अमेरिकेत येण्यापूर्वी मी कामाच्या निमित्ताने पाच वर्षे पुण्यात राहिलो होतो. अमेरिकेतली मराठी माणसे पुणेकरांपेक्षा मराठी संस्कृतीशी अधिक जोडलेली आहेत, असे मला वाटते. मी मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या बोरीसिंह या छोट्याशा गावात राहणारा. पूवीर् आमच्या विदर्भात थोडी शेतजमीन असणारा शेतकरीही खाऊन पिऊन सुखी असायचा. आता शेती हा गरिबी आणि वेठबिगारीसाठी समानाथीर् शब्द बनला आहे. शेतकरी कर्जाने मरतो आहे. कर्ज किती, तर दहा हजार रुपयांपेक्षाही कमी म्हणजे फक्त २६० अमेरिकन डॉलर. दहा हजारांसाठी माणसे मरत असताना मुंबईचे शांघाय बनवण्याच्या गमजा मारणे निव्वळ मूर्खपणा आहे. त्यापेक्षा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे नाही का? मी अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कॉपोर्रेशनमध्ये इंजीनिअर आहे. माझ्या पन्नासेक मित्रांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला १० डॉलर जमा करण्याचे ठरवले आहे. म्हणजे साधारणपणे ५०० डॉलर होतील. तेवढाच हातभार आमची कंपनी लावणार आहे. त्यामुळे दर महिन्याला ४० हजारांची मदत उभी राहिल आणि महिन्याला किमान चार शेतकऱ्यांची कर्जे फेडता येतील. आमच्या या उपक्रमात अनेकजण जोडत आहेत.

Friday, October 19, 2007

खरच मराठी माणुस असा आहे?

आज मी खुप दिवसाने सोनी टीवी वर "झलक दिखलाजा" हा कार्यक्रम पाहात होतो...आणि त्यात आपली मराठी मुलगी सोनाली कुलकर्णी डान्स करते....हे सांगायची गोष्ट नाही की छान करते ...पण सांगायची गोष्ट म्हणजे त्यात एक ट्रेड आहे की प्रत्येकाचे मित्र येतात आणि वोट साठी अपील करतात...
म्हणजे आपल्या फँन्स ला वोट पाठ्वण्यासाठी हाक मारतात.आणि जर डान्स आवडला असेल तर वोट करण्यासाठी सांगतात...तर सोनालीसाठी आले होते आपले शिवाजी साट्म (CID काका हो) आणि तिचे आई बाबा ....

आतापर्यत सर्व पारटीसिपेनट चे वोट अपिल ऎकले पण आपले शिवाजी काका बोलले की....
"तुम्हाला SMS करायचा नसेल तर Email करा कारन तो फुकट आहे..मला माहीत आहे की आपला मराठी माणुस खुप कंजुस आहे SMS करत नाहीत आणि त्यांमुळे आपली मराठी माणंस मागे राहत्तात, म्हूणुन सांगावासे वाटते की ..SMS महाग त्यापेक्षा स्वस्त BSNL ,MTNL नाहीतर Email आहे तो तर फुकट आहे तर कुपया मत द्या..."

आणि आपले शिवाजी काका हे एकदा नाही तर दोन वेळा बोलले ...खर सांगु खुप वाईट वाटले...
वाईट म्हणजे ...सोनाली ला मते न मिळाल्याबद्द्ल नाही...पण अवधा भारतच नाही तर मी ईथे $ च्या देशातही हा कार्यक्रम पाहत होतो...ज्यानी ज्यानी हे ऎकले असेल.... काय मत बनवले असेल मराठी माणसा बद्द्ल की ही माणस सर्व करत्तात पण जेव्हा पुढे यायची वेळ येते तेव्हा नको.... कोण करेल डोक्याला ताप..आणि आपलीच माणंस आपल्याला ओळखतात...छान..तेव्हा मनात एकच प्रश्न येतो....

खरच मराठी माणुस असा आहे?

Friday, September 28, 2007

www.apalimarathi.com

आज २८ सष्टेंबर आपले संकेतस्थळ मायाजाळावर येउन अगदी कमी दिवस झाले होते पण संकेतस्थळाचे येवढे प्रेमी होते की फ़्री सर्विस चे होस्टीगची बँडविथ कमी पडु लागली...आणि खुप जणाची निराशा होऊ लागली...

विचार केला की आता एक स्वतंत्र संकेतस्थळ बनवायची गरज आहे... कारण इथपर्यंत येउन असं सर्वाना नाराज नाही करता येणार ..पण प्रश्न होता की एकट्याला हे जमेल का ,एक स्वतंत्र संकेतस्थळ बनवणे वाटते तेवढे सोपे नाही मंजे काम आणि पैसे दोन्ही लागतात...विचार करत होतो कि मला जमेल का...होईल का? एव्हना छेपेल का ?....अगदी टिपिकल मराठी माणसाला येतात ना :) तेच सर्व प्रश्न मला पण आले.....

पण अखेर विचार केला होईल ...एखादा विचार केला ना मग आपण तसे करु शकतो.. आणि नाही झाले तरी खुप जण आहेत ते मला मदत करायला धावतील..

अखेर खुप शोधाशोध करुन एक प्रोवाईडर नक्की केला आणि आपले संकेतस्थळ रजिस्टर करुन टाकले..
त्या पण नको तितक्या अडचणी ..म्हणतात ना की सर्व नीट झाले तर मग त्यात कष्ट कसले...आणि मला सर्वाचा शनिवार रविवार वाया नव्हता घालवायचा...त्या विचित्र मेसेज ने....
आणि आज सर्वासमोर आहे आपले नवीन संकेतस्थळ. http://www.apalimarathi.com/ मला माहीत आहे मी काही प्रोफेशनल वेब मास्टर वगैरे नाही पण हो होईन मात्र नक्की ..त्यामुळे काही चुका असतील तर माणुन घ्या.. तसे नाव कसे वाटले तेही सांगा..खरतर मला नाव सुचतच नव्हत ..मग एकामित्राला विचारले म्हट्ले लवकर सांग मी रजिस्टेशन पेज वर आहे..तो म्हटला थांब जरा ...मी म्हट्ले
"Please come up with name in 2 min else I will name this site as TOMATO.com " :) कळले का?
हा हा हा.....जोक होता यामागे मोठी स्टोरी आहे माहीत नसेल तर विचारा कोणाला तरी...

मग नाव नक्की झाले आणि आज आपली साईट लाईव... शनिवारच्या आत...:)


आपला मराठी प्रेमी
वेबमास्टर ( नवीन :)
http://www.apalimarathi.com/

Saturday, September 22, 2007

संकेतस्थळ का आणि कशासाठी?

कस असत नाही आपल मन पण ना नेमक जे आपल्याकडे नाही त्याच्या कडेच धावत असत आणि जेव्हा ते मिळ्ते तेव्हा मात्र ….

सर्वासारखाच मी, काही काळापुर्वी चमचमत्या अमेरीकेची क्षणचित्र पाहुन येथे येण्याची इच्छा झाली..
वाटल नवीन देश पाहु , आज वर जे कुटुंबानी माझ्यासाठी जी स्वप्न पाहीली ती पुर्ण करु… आणि "पोरेन रीर्ट्न" होऊ :) आणि मग येथे येउन पोहचलो…घर सोडताना तसे जास्त काही वाट्ले नाहि ,कारण महाविद्यालयात पण मी घराबाहेर होतो...पण तेव्हा हे कळल नाही कि त्यात आणि यात खुप फरक होता… तरीही अगदी आनंदात स्वारी निघाली डाँलरच्या देशी ..असो…. तर पुढे

येथे पोहल्यावर पहीली काही दिवस खुप छान वाटले…नवीन माणसे ,नवीन देश…सर्वच नवीन ..पण त्या सर्व गरड्यात एक गोष्ट लक्षात आली की या देशाला डाँलरचा देश का म्हणतात …कारण येथे फक्त डाँलर बोलतो बाकी सगळे शुन्य…भावनाना किंमत नाही…कोण कुठे कसा …याची कोणाला चिंता नाही…

काही दिवस निघुन गेले, तसे तसे दुरव्याची भावना वाढत गेले ..धन्यवाद या फोन चा आणि नेट चा…
मग काय तासन तास..मी फोन वर बोलु लागलो..आणि माझा ल्यपटोप माझ्या जिवनाचा अविभाज्य घट्क बनला..तसा सर्व मराठी अमेरिकेतिल माणसाचा तो अविभाज्य घट्कच असावा अस मला वाटत…

मग त्या नंतर सुरुवात झाली एका न संपण्या-या शोधाला की "आपण दुर राहुन पण कसे बरं आपल्याला अगदी आपल्या देशात असल्यासारखे वाटेल"…आणि त्यात देव झाला “गुगल बाबा”…खुप काही शोधले…ज्यांनी विरंगुळा होऊ शकेल..पण खुप काही कमी मिळाले मला ..म्हणजे ऎका मराठी माणसाच्या अपेक्षे पेक्षा कमी….म्हणजे विचार करा ना आपल्या अपेक्षा असताततरी कीती…
आणि नंतर एक विचार केला की हे फक्त माझ्याबरोबर होते की सर्वाबरोबर?…तेव्हा कळ्ले की हा तर सर्वाचा मोठा काळजातला खड्डा आहे….म्ह्टले बस…आता काही तरी करायला हवे आणि मग ख-या मेहनतीला सुरुवात झाली.. आणि एक विचार केला जर मी दिवसात एका जरी माणसाला येथे परदेशात आनंद देउ शकलो तर वाटेल कि काहीतरी मिळवले…

आणि तेव्हा मी या साईट चा विचार केला…आणि मला वाटेत माझ्यासारखे भरकटलेले ऎवढे जण मिळाले की विचारु नका…..अगदी तसेच …अगदी आत्मियतेने मराठी पहाणारे….मग हे सर्व आतिशय वेगाणे सुरु झाले… आणि आज आपण पाहत आहात, पण खरंच जेव्हा कोणी सल्ला देते, प्रसंसा करते एव्हाना चुका दाखवते तेव्हा...रात्रदिवस केलेल्या कामाचे चिज झाले असे वाटते,सर्व थकवा जातो...

आणि आज मला असे वाटते की.…या मायाजाळावर असणा-या ५.८ करोड संकेतस्थळामध्ये असे कोणते संकेतस्थळ असेल का जे आपल्या संकेतस्थळापेक्षा जास्त मराठीचे सर्व वेगळे प्रकार आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करत असावे… माझ्या निर्दसनास तर नाही अजुन....तुम्हाला काय वाटते...

सरते शेवटी एवढेच समाधान आहे…की “एक मराठी प्रेमी” मुळे खुप मराठी प्रेमी खुश आहेत…..

एक मराठी प्रेमी...

http://marathimovies.googlepages.com/